५ हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी लाचलुचपत’च्या जाळ्यात…

images-9.jpeg

विशेष प्रतिनिधी – जळगांव शहरातील प्रिंप्राळा येथील मंडळ अधिकारी यांनी सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खंडू बाविस्कर वय-४७, रा. पिंप्राळा असे लाच घेणाऱ्या मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील सावखेडा गावाचे रहिवाशी आहेत. सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांच्या वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात १६ मे रोजी अर्ज केलेला होता. त्यानंतर २० मे रोजी तलाठी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजाराची लाचेची मागणी केली होती . त्यानंतर तक्रारदार यांनी २७ मे रोजी जळगाव येथील जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे कार्यालय येथे येवून तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरूवारी ६ जून रोजी सापळा रचून मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांना ५ हजारांची लाच घेत असतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव शहरातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!