रिक्षा चालकाची अचानक तब्येत बिघडल्याने बेशुद्ध होऊन मयत.
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील तरुण रिक्षा चालकाची अचानक तब्येत खराब झाल्याने तो मृत झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की योगेश निळकंठ पाटील वय २८ यांची तब्येत बिघडल्याने स्वतः ची रिक्षा घेऊन म्हसावद येथे डॉक्टर कडे गेला.तेव्हा त्याला तपासून डॉक्टरांनी एरंडोल येथे दवाखान्यात जाऊन तपासणी करण्यास सांगितले. तो रिक्षा घेऊन एरंडोल कडे येत असताना खडके फाट्याजवळ अचानक त्याची तब्येत अजुन जास्त बिघडल्याने तो बेशुद्ध होऊन पडला. त्यावेळी त्याचा फोन वाजत असल्याने तेथून जाणाऱ्या अनोळखी इसमाने फोन उचलला सदर फोन त्याच्या आईचा असल्याने त्याने तेथील परिस्थितीची जाणीव आईला दिल्याने त्याठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी योगेश यांस एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला नितीन धनराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली असुन पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक रवि तायडे हे करीत आहेत.