चार चाकीच्या धडकेत मोटारसायकल स्वार पिता पुत्र जखमी.
प्रतिनिधी – एरंडोल म्हसावद येथून एरंडोल कडे मोटरसायकल पिता पुत्र येत असताना त्यांच्या मोटारसायकल ला मागुन येणाऱ्या मालवाहू चारचाकी ने धडक दिल्याने दोघं जखमी झाले आहेत.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरुन मिळालेली माहिती अशी की म्हासावद येथुन एरंडोल कडे मोटर सायकल क्रमांक एम एच १९ डीयु ९९३८ हिस मागून खर्ची तांडा दत्त मंदिरात जवळ टाटा कंपनीच्या इको एम.एच.१९ सी.वाय.८३६२ मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी ने
धडक दिल्याने मोटरसायकल स्वार सूभाष जोरसिंग पवार ( वय ४५) व त्यांचा मुलगा रवींद्र जोरसिंग पवार (वय २३) हे जखमी झाले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला सुभाष पवार यांनी मालवाहू छोटा हत्ती चालक विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.