अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचे पलायन .
तलाठी सागर कोळी जखमी…
प्रतिनिधी – दिनांक २४ जुन रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर येत असल्याची बातमी आल्याने नायब तहसीलदार दिलीप पाटील तलाठी सागर कोळी सदानंद मुंडे सुरेश कटारे, सुधीर मोरे व लिपिक ऋषिकेश पोळ व याज्ञनिक यांना सदरचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी शासकीय वाहनाने पाठवण्यात आले असता शहराजवळ त्यांनी ते ट्रॅक्टर पकडले सदरचे ट्रॅक्टर शहरातून आणत असताना मरी माता मंदिराजवळ ट्रॅक्टरच्या मालकाने मागून येऊन वाहन चालकास ट्रॅक्टर पलटी कर असे सांगितले असता त्याने अचानक ट्रॅक्टर वेगाने पलटी केले व पळून गेले
या घटनेमध्ये तलाठी सागर कोळी ट्रॅक्टर वर बसलेले असताना त्यांना गंभीर मुक्का मार लागलेला असून पायाला व डोक्याला मार लागलेला आहे, त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर चालक व मालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती दिली.