Picsart_24-06-27_18-24-50-510.jpg


प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील निपाने येथील हरिहर माध्यमिक हायस्कूल चे मुख्याध्यापक यांना त्यांच्या शाळेतील शिपया कडून  मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या रकमेतून ५ टक्के लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
        या बाबत सविस्तर वृत्त असे की निपाने येथील हरिहर माध्यमिक हायस्कूल येथील शाळेत शिपाई पदावर नेमणुकीस असलेल्या शिपाई यांनी त्यांच्या मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या फरकाची रक्कम 2,53,670/-रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्या कडे पाठविला होता. सदर प्रस्ताव मंजुरीचे काम मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन यांनी स्वतः च्या ओळखीने करून दिले होते.त्याचा मोबदला म्हणुन मंजुर रकमेच्या 5% प्रमाणे 12,500/-रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक यांनी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 25/06/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक यांनी वेतन निश्चितीचे आलेले 2,53,780/-रुपयांचे 5%प्रमाणे 12,500/-रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/-रुपयांची मागणी केली. त्यानंतर दिनांक 27/06/2024 रोजी मुख्याध्यापक यांना मुख्याध्यापक कार्यालय निपाने ता.एरंडोल येथे 10,000/-रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.यावेळी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली.सदर सापळा शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक,नरेंद्र पवार,वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षक अधिकारी सुहास देशमुख,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव,सापळा  व तपास अधिकारी अमोल वालझाडे,पोलिस
निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव,सापळा पथक        
पी.एस.आय.दिनेशसिंग पाटील,पो.ना. बाळू मराठे यांनी काम पाहिले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!