वन्य प्राण्यांमुळे सात एकर मका केला उद्ध्वस्त..

Picsart_24-06-29_09-59-34-585.jpg



प्रतिनिधी एरंडोल : तालुक्यातील उमरदे  शिवारातील  गट नंबर  १९७/२  क्षेत्र सात एकर शेतात पेरणी केलेल्या मक्याचे पीक वन्यप्राणी रानडुकरांनी रात्री शेतात येऊन उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.येथील प्रगतिशील शेतकरी तथा माजी उपनगराध्यक्ष संजय खंडू महाजन व मालती सुभाष महाजन यांचे पद्मालय शिवारातील उमरदे येथे शेती आहे. संजय महाजन व मालती महाजन यांनी  सात एकर क्षेत्रात मक्याची पेरणी केली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रानडुकरांनी संजय महाजन यांच्या शेतातील पेरणी केलेले
मक्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संजय महाजन यांनी रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.

    याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संजय महाजन व मालती महाजन यांनी केली आहे. दरम्यान, पद्मालय शिवारात यापूर्वी देखील वन्यप्राण्यांनी अनेक शेतकऱ्यांच्य शेतातील पिकांचे नुकसान केले असल्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जंगलात रानडुकरांची संख्या जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पद्मालय शिवारात घनदाट जंगल असल्यामुळे रानडुकरांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त वन विभागाने  करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!