प्रामाणिकपणाचे कौतुक;  रिक्षा चालकाने सोने केले परत.

IMG-20240627-WA0022.jpg



प्रतिनिधी एरंडोल – एकविसाव्या शतकात देखील इमानदारी जिवंत असल्याचा प्रत्यय सध्या एरंडोल तसेच पारोळा वाशीयांना आला आहे. इमानदारीचे दर्शन घडवणाऱ्या रिक्षा चालक मयूर पाटील चे कौतुक दोन्ही तालुक्यातील जनते कडून होत आहे.
   सविस्तर वृत्त असे की दि२६ रोजी एरंडोल बस स्टँड येथून एक महिला प्रवासी डॉ.बोहरी यांच्या दवाखान्यात  जाण्यासाठी मयूर पाटील यांच्या रिक्षा मध्ये बसून दवाखान्यापर्यंत गेल्या. प्रवासी सोडून मयूर आपल्या थांब्यावर आल्यानंतर त्यांना आपल्या गाडीच्या प्रवासी सीटवर सोन्याचा दागिना दिसून आला.हा दागिना आपण सोडून आलेल्या महिला प्रवाशाचा असावा म्हणून मयूर ने दवाखान्यात जाऊन  त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना महिला मिळाली नाही. त्यानंतर मयुर यांनी दवाखाना कर्मचाऱ्यांकडून महिलेची चौकशी केली असता सदरील महिला पारोळा येथील असल्याचे समजले.मयुरने दवाखान्यातील रेकॉर्ड वरून महिलेचे नाव एनुर बी रफिक खान,महाराष्ट्र बेकरी जवळ, पारोळा तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असल्याचे कळले तसेच त्यांनी सदर महिलेचा दूरध्वनी क्रमांक मिळवून फोनद्वारे मिळालेल्या ऐवजाची शहानिशा करून  माझ्या रिक्षात आढळून आल्याचे सांगून आपण एरंडोल बस स्टँड ला येऊन घेऊन जावे असे सांगितले.दरम्यान महिलेला आपला ऐवज परत देतांना महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मयुर ला ही समाधान झाले तसेच मयूर चे देखील महिलेने आभार मानून भरभरून कौतुक केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!