एरंडोल तालुका येथे क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न..

IMG-20240702-WA0012.jpg



एरंडोल प्रतिनिधी — येथे दिनांक २/७/२०२४ रोजी क्रीडा शिक्षकांची सविचार सभा बि आर सी हॉल एरंडोल या ठिकाणी घेण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक  व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी आर. डी.महाजन  यांचा उपस्थितीत सभा संपन्न झाली सभेचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी  रवींद्र नाईक हे होते.

या सभेत तालुक्यातील ४० क्रीडा शिक्षक उपस्थित होते शैक्षणिक वर्ष २०२४/२५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शालेय क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन व नियोजन व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवण्याचा बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. सभेसाठी आलेले सभेचे अध्यक्ष   नाईक  यांनी ऑनलाइन विद्यार्थी नोंदणी कशी करावी व या वर्षापासून ऑनलाईन तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहेत व शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.तर एरंडोल गटशिक्षणाधिकारी महाजन  यांनी

शिक्षकांना शालेय क्रीडा स्पर्धांचा नियोजन करण्यास सांगितले व स्पर्धा या चांगल्या प्रकारे नियोजन पूर्व कराव्यात अशा सूचना दिल्या ज्या शाळा स्पर्धांना मध्ये सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी  सूचना देखील दिल्या. तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी व तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात  यांनी ऑनलाइन प्रशिक्षण बाबत शिक्षकांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज पाटील आभार प्रदर्शन के. के. पवार  यांनी केले.
      सादर कार्यक्रमात एस. एस. पाटील ,  सचिन महाजन , पि.ओ. चौधरी, डि. के. पाटील, एस एस पाटील, के.पी. साळुंखे, एस.एन. निकुम, पी.पी.पाटील, युसुब खान एन.यु. पाटील, आर. के. पाटील, मोहसीन खान ,आबा महाजन , रविंद्र चिंचाळे , श्रीमती वैशाली पाटील, डी. बी. पाटील ई. प्रशिक्षण सभेसाठी शिक्षक हजर होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!