आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार शिक्षक संघटनेमार्फत वृक्षारोपण .

IMG-20240706-WA0005

विशेष प्रतिनिधी नंदुरबार :- महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालय राज्यस्तरीय अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या वतीने जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला. अनेक संस्कृतीमध्ये झाडे आदरणीय व पवित्र मानले जाते. आपल्या देशात झाडांची पुजा केली जातात. मात्र शहरीकरणाच्या झपाट्यामुळे दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणात उष्ण तापमान वाढलेले. याची प्रचिती नागरीकांना जानवत आहे तसेच आज माणूस फक्त अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या मागे आपले आयुष्य व्यतीत करतो परंतु पर्यावरण हा मुख्य घटक सध्या तो विसरुन चाललेला आहे. त्यामुळे फक्त झाडे लावणे हा फक्त उद्देश नसून ती कशी जगवता यावी या गोष्टीकडे लक्ष देऊन या संकल्पनेतुन सामाजिक उपक्रम म्हणून प्रहार शिक्षक संघटनेमार्फत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. झाडे लावा मोहिमेला जिल्हाभरातून अनेक चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई सर, शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट सर यांच्या आवाहनानुसार , कोरोणा सारख्या महाभयंकर रोगाला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेता, ती भागविण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून, माजी शालेय राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांच्या साहेबांच्या वाढदिवशी झाडे लावण्याचा संघटनेमार्फत सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला होता . वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावायला हवे. आपल्या शाळेत तसेच परिसरात वृक्षारोपण करताना फोटो काढून पाठवावेत असे आवाहन केले होते. नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित यांनी नव्या युगाचे नवे आराधन, सतत करुया वनसंवर्धन या प्रमाणे सतत वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. वृक्षांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असतेच पण त्याहून ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करुन वनसंवर्धन करणे ही प्राथमिक जबाबदरी आहे, असे मत व्यक्त केले. संत तुकाराम महाराज म्हणतात कि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ..पक्षीही सुस्वरे आळवीती वर्षानुवर्षे कमी होत असलेले पर्जन्यमान वाढवण्यासाठी झाडे लावणे नितांत आवश्यक आहे झाडे लावल्यामुळे जमिनीची धूप थांबते तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्या घराशेजारी किंवा घरासमोर झाड असेल तर उन्हाळा जास्त जाणवत नाही. असे मत प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट यांनी मत व्यक्त केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!