किरकोळ वादातून चाकूने केले वार व लाकडी दांडयाने मारहाण
प्रतिनिधी -एरंडोल येथे हॉटेल केसरीमध्ये परागसिंग किशोर सिंग परदेशी हे मित्रासोबत हॉटेल केसरी येथे रात्री पार्टी करीत असताना रणवीर मंगेश जैस्वाल व राजवीर मंगेश जैस्वाल यांच्यासोबत वाद झाल्याने तो वाद मित्रांनी मिटवीला होता. परंतु रात्री ११.५० वाजेच्या सुमारास उपसरपंच चहा या दुकानात परागसिंग परदेशी हा चहा पिण्यास गेला असता रणवीर व राजवीर जयस्वाल यांनी तेथे जाऊन परागसिंह परदेशी यास रणवीर याने चाकूने हातावर पोटावर मारून जखमी केले व राजवीर ने लाकडी दांडयाने डोक्यावर , हातावर व मानेवर मारहाण करुन जखमी केले . याबाबत पराग परदेशी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन दोघांविरुद्ध कलम ११८(१) , ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संतोष चौधरी हे करीत आहे