एरंडोल येथे नवीन वसाहती तील रस्ते व्यवस्थित करा व शेतकऱ्यांना खते त्वरित उपलब्ध करावेत यासाठी ( अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको.

Images1156377987

प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग ६ वर आज दि.९ रोजी अमळनेर नाका परिसरात सकाळी १० वाजता नवीन वसाहतीतली रस्त्याची परिस्थिती लवकर सुधारावी,शेतकरी वर्गाला गावात मिश्र खते वेळेवर मिळत नाही ते मिळावे यासाठी आज रस्ता रोको करून महामार्ग चाळीस मिनिटे बंद करण्यात आला व नगरपालिका व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सदर रस्ता रोको अजीत पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,नवीन वसाहतीतील रहिवासी, शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

निवेदनात खालील विषयाच्या मागण्या केल्या आहेत.एरंडोल शहरातील गेल्या २५ वर्षापासून नविन वसाहतीत अद्यापही नागरी सुविधांचा अभाव आहे. चालायला रस्ते नाहीत,गटारी नाहीत.पावसाळयात पायी चालणे देखिल अवघड झालेले आहे.सर्व रहिवासी नियमित नगरपालिका व शासनाचा कर भरत असतात.तरी देखिल नागरी सुविधा काहीही पुरविल्या जात नाहीत. पाणीपुरवठा अमृतयोजनेमुळे रस्त्यांची पार वाट लागलेली आहे. आता पावसाळा सुरू असल्यामुळे कॉलनीत चालणे मुश्किल झाले आहे. तरी प्रशासनाने त्वरीत आठ दिवसाच्या आत सर्व नविन वसाहतींमध्ये कच टाकून तात्पुरता चालण्यासाठी रस्ता तयार करून दयावा व लवकरात लवकर पक्के रस्ते व भुयारी गटारी करण्याची व्यवस्था करावी तसेच शेतक-यांना गावात मिश्र खते वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतक-यांचे खुप हाल होतात, ऐनवेळी जादा किमतीने खते घ्यावी लागतात.यासाठी तालुका कृषि अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या मागण्या लवकर पूर्ण कराव्या अन्यथा भविष्यत्त मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा उपस्थितांनी दिला..या आंदोलनात माजी नगर सेवक डॉ.सुरेश पाटील,अभिजित पाटील,राजेंद्र शिंदे ,गोरख महाजन ,नाना मिस्तरी राजेंद्र शिंदे, गजानन पाटील, नाना देवरे, बापू महाजन , सुहास महाजन, रमेश पाटील, गणेश पाटील, हितेश महाजन, जगदीश मोरे, शेखर पाटील, भुषण देवरे, नंदलाल शर्मा, संजय पाटील, हिंमत महाजन, भय्यासाहेब सोनवणे सुदर्शन बागुल, बाळू पाटील, विकास देशमुख, हिंमत पाटील, मुश्ताक शेख, आदी कार्यकर्ते, मोठ्या संखेने नवीन वसाहतीतील रहिवाशी तसेच शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About Author

You may have missed

error: Content is protected !!