५० हजाराची लाच स्वीकारताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात.!

Images862209374

प्रतिनिधी :- वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या भडगाव पोलिस हवालदार किरण पाटील याला जळगाव एसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी दि २६ जुलै रोजी झालेल्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली. यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापुर्वी भडगांव पोस्टेला अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे. तक्रारदार यानां सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे २,६०००हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दिनांक २५ जुलै रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे २.६०००रु मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडी नंतर पंचासमक्ष ५०००० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी यांचेवर भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल किरण पाटील यांना नुकताच पोलिस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेला तक्रारीनुसार त्याच्यावर रंगेहाथ लाच स्वीकारतांना पकडल्याची कारवाई झाल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे जळगाव एसबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव, पो.उपनि. दिनेश पाटील, पो.कॉ राकेश दुसाने .पो. कॉ. अमोल सुर्यवंशी जळगांव एलसीबी पथकाने याबाबत संशयितविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!