प्रकल्पग्रस्त सोनबर्डी गावाचे पुनर्वसन त्वरित करा.

IMG-20240729-WA0127

डॉ संभाजीराजे पाटील यांची मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी -एरंडोल तालुक्यातील मौजे सोनबर्डी गावाच्या भेटी दरम्यान हे गाव अंजनी प्रकल्प निमित्ताने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या मात्र सदर गाव हे नदीला लागून असून दर पावसाळ्यात हे गाव पुराच्या पाण्याने वेढुन नागरिकांचे जीव हे धोक्यात असतात. त्याचबरोबर प्रत्येक पावसाळ्यात या गावाच्या भिंतींचे, गोठ्याचे, प्राणीमृत्यू असे अनेक घटनांनी नुकसान होत असते. गावाचा संपर्क तुटतो, गावातील नागरिक हे जीव मुठीत घेऊन गावातच अडकतात यात महिला व लहान बालके यांची विशेष चिंता असते. मागच्या वर्षी देखील काही गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली.
सदर गाव हे प्रकल्प बाधित असल्याने या ठिकाणी कोणतेही नवीन विकासकामे होत नसल्याने परिस्थिती अधिक बिकट होत आहे. साधी शाळा देखील या गावात उपलब्ध नाही. हे निदर्शनास येताच या गावाच्या पुनर्वसन बाबत त्वरित निर्णय घेऊन, मौजे सोनबर्डी गावाच्या नागरिकांना या जीवघेण्या परिस्थितीतुन दिलासा द्यावा.
या साठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना निवेदन देऊन परिस्थिती बाबत चर्चा करून लवकर निर्णय घेण्यासाठी विनंती करण्यात आली त्याचबरोबर या गावाच्या समस्येसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे डॉ संभाजीराजे पाटील यांनी सांगितले.
डॉ. संभाजीराजे पाटील यांचा सुरू असलेला “जन आशीर्वाद” संवाद यात्रा निमित्ताने प्रत्येक गाव प्रत्येक घर संपर्क ते करीत आहेत यावेळी मतदारसंघातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेणं, त्याच निराकरण करणं, प्रलंबित विषय शासन दरबारी पोहोचविणे देखील सुरू आहे .

About Author

You may have missed

error: Content is protected !!