डॉ नरेंद्र ठाकूर यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावच्या ” देहदान विषयक समिती ” वर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती.

Images-913196265.jpg


प्रतिनिधी – एरंडोल येथील माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकुर यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय” देहदान विषयक समिती ” वर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जळगाव येथे पहिल्यांदाच देहदान विषयक समितीची स्थापना करण्यात आली आहे . अधिष्ठाता मान .डॉ.गिरीश ठाकूर हे समितीचे अध्यक्ष असून  उपाध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड ,शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख  डॉ.अब्दुल राफे , न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वासनिक यांचा समावेश आहे .
सुखकर्ता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत गेल्या बारा वर्षांपासून डॉ.नरेंद्र ठाकूर हे “अवयवदान – देहदान ” क्षेत्रात व्याख्यान ,  वृत्तपत्रीय लेख , सोशल मीडिया , मुलाखती , चर्चा सत्रांद्वारे जनजागृती करत आहेत . देहदान संकल्प पत्र भरणे , देहदानासाठी येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाशी सुसंवाद साधणे , देहदान सुकरपणे होण्यासाठी मार्गदर्शन करणे व देहदानाविषयी जनसामान्यांमध्ये असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याबाबत सुखकर्ता फाउंडेशन कार्य करत असते .मानवी देहाच्या माध्यमातूनच शिकाऊ डॉक्टरांना शरीररचना शास्त्राचा अभ्यास करावा लागतो . त्याद्वारेच निष्णात व प्रशिक्षित डॉक्टर हे घडत असतात . त्याचप्रमाणे गुंतागुंतीच्या शल्यक्रिया शिकण्यासाठी , संशोधनासाठी  , नाविन्यपूर्ण बाबी अभ्यासण्यासाठी , प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणेसाठी सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांना हि मानवी देहाची गरज भासत असते . मानवी देह हे “स्वेच्छा  देहदानाच्या “स्वरूपातच  वैद्यकीय महाविद्यालयास  प्राप्त होत असतात . सद्यस्थितीत शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देहदानाची टक्केवारी अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत आहे . नव्यानेच गठीत करण्यात आलेल्या या समितीच्या माध्यमातून “स्वेच्छा  देहदानाविषयीच्या ” कार्यास गती मिळावी व या विषयी भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था यांचे हि मार्गदर्शन व सहकार्य शासनास मिळावे या अपेक्षेने मान . अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी डॉ.नरेंद्र ठाकूर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे .
डॉ नरेंद्र ठाकूर हे ” रोटो ” या शासकीय संस्थेमार्फत आयोजित अवयवदान जनजागृती कार्यशाळेत प्रशीक्षित आहे तर नवी दिल्ली येथे सप्टेंबर २२मध्ये आयोजित राष्ट्रीय अवयव – देहदान महासंमेलन मध्ये उत्तर महाराष्ट्रातून निमंत्रित होते .
  सध्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी , जळगाव ह्या संस्थेच्या “बॉडी  व ऑर्गन डोनेशन कमिटी ” चे चेअरमन म्हणून हि डॉ.नरेंद्र ठाकूर कार्यरत आहे .
    डॉ.ठाकूर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!