श्रावण सोमवार निमित्ताने दादाजी भक्तांकडून जलाभिषेक

IMG-20240805-WA0158

प्रतिनिधी – श्री १००८ दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सेवाधाम सांगवी (तीर्थक्षेत्र तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण सोमवार निमित्त श्री दादाजी भक्त मंडळ विविध ठिकाणाहून जल आणून प्रत्येक श्रावण सोमवारी श्री गुरुमाऊली महाराज सेवानंदजी महाराज समाधी अभिषेक व इतर मंदिरातील अभिषेक आरती पूजन व भंडाराचे आयोजन होत असते पहिल्या श्रावण सोमवार निमित्त नवतरुण दादाजी सेवा मंडळ सांगवी यांनी रामेश्वर त्रिवेणी संगम येथून जल आणून अभिषेक संपन्न केला पुढील श्रावण सोमवारी निमित्त विविध ठिकाणाहून जल आणून अभिषेक करण्यात येईल तसेच नारळी पौर्णिमा निमित्त श्री दादाजी भक्त परिसर पाचोरा येथील भक्त मंडळ तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर नर्मदा कावेरी संगम पायी कावड यात्रा जल आणण्यात येणार आहे तसेच सप्टेंबर महिन्यात दरवर्षीप्रमाणे गुरुमाऊलींच्या पुण्यतिथी सोहळा निमित्त नाशिक येथील भक्त परिवाराकडून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पायी कावड यात्रा जल आणण्यात येते व तसेच श्री गुरुमाऊली सेवानंद जी महाराज जन्मोत्सव निमित्तही 31 ठिकाणाहून जल आणून अभिषेक करण्यात येतो तरी सर्व कावडयात्रीय सेवाभावी बंधूंचे श्री दादाजी दरबार सांगवी प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्याकडून सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!