एरंडोल येथे “आपला दवाखान” चे उद्घाटन.
प्रतिनिधी एरंडोल :- येथे जहांगीरपुरा परिसरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना क्रमांक दोन चे उद्घाटन प्रभारी गटविकास अधिकारी विजय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड हे होते सुरुवातीला धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन केशर केशव ठाकूर यांनी केले आभार सतीश महाजन यांनी मानले. यावेळी डॉक्टर साक्षी सातपुते आरोग्य विस्तार शिवाजी गुरगुडे गुलाब चौधरी निलेश पाटील आरोग्य सेवक कैलास पाटील सतीश महाजन दत्तात्रय अग्निहोत्री उपस्थित होते. अशाप्रकारे एरंडोल शहरासाठी गरीब व होतकरू रोणांसाठी शहरात तीन ठिकाणी अशा प्रकारचे दवाखाने मंजूर झाले आहे त्यापैकी मागील वर्षी जुन्या नगरपालिकेजवळ एक दवाखाना सुरू असून आता दुसरा दवाखाना या स्लम एरियामध्ये सुरू करण्यात येत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.