एरंडोल तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनी दिले विविध मागण्यांचे निवेदन….
एरंडोल( प्रतिनिधी) एरंडोल तहसील कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत तहसीलदार सुचिता चव्हाण यांना ई पॉज मशीन व स्वस्त धान्य दुकानदारांना इंटरनेट सेवा व सर्वर डाऊन होणे , धान्य उपलब्ध असून सुद्धा सर्वर व इंटरनेट सभेमुळे वितरित न होणे , महागाईच्या इष्टांकानुसार कमिशन मध्ये वाढ होणे , केवायसी करण्याबद्दल मानधन मिळणे , लाभार्थ्यांना धान्य ऑफलाईन वितरित करण्याबाबत व इतर समस्या दूर करण्यासाठी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले तसेच इपोज मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष पुणेश जी मंत्री रवींद्र जोगी, राजूभाऊ वंजारी, बाबुलाल माळी संजय पाटील बाबूलाल मराठे गणेश पिंगळे जिया उद्दीन शेख राजू मानधने, दिलिप चाखाले, ईश्वर बिऱ्हाडे, समाधान पाटील, राजु मराठे , अनिल बडगुजर, भरत पाटील, आय एम पटेल, जाकिर खाटीक , सोनु नागडेकर, भाऊसाहेब पाटील, बबलु राठोड,व सर्व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.