महसूल पंधरवाडा निमित्त ‘एक हात मदतीचा – दिव्यांगाच्या कल्याणाचा..
प्रतिनिधी -महसूल पंधरवाडा निमित्त ‘एक हात मदतीचा – दिव्यांगाच्या कल्याणाचा’ अंतर्गत वनकोठे येथील सहवास प्रौढ मतीमंद संस्थेत विद्यार्थांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम तसेच त्यांना आवश्यक शिधा देण्यात आला. तसेच शासकीय दिव्यांग योजनांची संस्थाचालकांना माहिती देण्यात आली
यावेळी तहसीलदार मॅडमांनी या मुलांना महसूल परिवार मार्फत शक्यती मदत देण्याचे आश्वासन संस्थेचे संचालक समाधान सावंत यांना दिले.
यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसीलदार संजय घुले ,दिलीप पाटील, मंडळ अधिकारी मनोज शिंपी, उदय निंबाळकर, दीपक ठोंबरे, अ. कारकून विनायक मानकुमरे,सुयोग कुलकर्णी,संदीप निळे,लिपिक ऋषीकेष पोळ,जगदीश दामले, तलाठी बालाजी लोंढे ,कोतवाल,पोलिस पाटील उपस्थित होते
या कार्यक्रमाला कासोदा येथील तलाठी बालाजी लोंढे,व मंडळ अधिकारी मनोज शिंपी यांचे विशेष सहकार्य लाभले.