आनंदनगरमधील पुस्तकांचा बगीचा परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य , बगीचा पाहण्यासाठी येणार्‍या नागरीकांनी फिरवली पाठ-नपाने लक्ष देण्याची मागणी

Images-2096901543


एरंडोल -येथील आनंद नगरामधील नपातर्फे उभारण्यात आलेला ’पुस्तकांचा बगिचा’ उपक्रम महाराष्ट्रात सर्वत्र गाजला. परंतू सदर उपक्रमाच्या जवळ असलेल्या दोन्ही रस्त्यांना मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून संपूर्ण बगीचाला चिखलाचा विळखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.


पुस्तकांच्या बगिचात आनंदनगरसह परिसरातील नवीन वसाहतींमध्ये पावसाळ्याअगोदर नागरिकांची मॉर्निंग वॉक व इव्हीनिंग वॉकसाठी या ठिकाणी गर्दी होत होती. याशिवाय बाहेरगावचे पाहुणे (अधिकारी) देखील भेट द्यायला येत होते. परंतू रस्त्यांच्या समस्येमुळे कोणीही या बगिच्याकडे सहसा फिरकतांना दिसत नाही. ज्याप्रमाणे या बगिच्याच्या आतील भागात कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे बगीच्यात येण्यासाठी दोन्ही रस्त्यांसह आनंद नगरामधील इतर रस्त्यांचे देखील त्वरित खडीकरण व मजबूतीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.
सन 2022-23 मध्ये त्यावेळचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्या कार्यकाळात पुस्तकांचा बगीचा संकल्पना आनंदनगरमध्ये साकारण्यात आली. संकल्पना महाराष्ट्रात सर्वत्र गाजली. दूरदूरचे अधिकारी वर्ग बगीचा पाहण्यासाठी येत होते. परंतू गेल्या 2/3 महिन्यांपासून पावसाने उघडीप न दिल्याने पुस्तकांच्या बगीच्याच्या आजूबाजुला चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून तेथे पायी चालणे देखील कठीण झाले आहे. परिणामी बगीचा पाहण्यासाठी येणार्‍या तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍यांची गर्दी कमी झालेली दिसून येत आहे. पूर्वी रात्री 10 वाजेपर्यंत सदर बगीचा सुरू राहत असे परंतू आता तिथे रस्त्यांअभावी कोणी फिरकतच नसल्याने नाईलाजास्तव सिक्युरीटी गार्डला रात्री 9 ते 30 वाजेच्या दरम्यानच बंद करावा लागतो. तरी सदर बगीचाच्या दोन्ही रस्त्यांसह आनंदनगरमधील इतर रस्त्यांकडे नवीन रूजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्याधिकारी तथा प्रशासक किरण देशमुख यांनी आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी आनंदनगरसह परिसरातील नागरीकांनी केली आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!