एरंडोल येथे गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी युवकास अटक..!
एरंडोल प्रतिनिधी : येथे सिल्वर रंगाची लोखंडी त्यास प्लास्टिकची मुठ असलेल्या गावठी पिस्तूल ताब्यात बाळगणाऱ्या एका २० वर्षीय युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले व त्यास अटक करण्यात आली आहे.
केवडीपुरा भागात राहणाऱ्या प्रविण रविंद्र बागुल वय २० वर्षे या तरुणाकडे २५हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाल्यावरुन शनिवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास एरंडोल शहरातील बी.एस.एन.एल. कर्यालयानजीक पिंप्री रोडलगत प्रविण रविंद्र बागुल याच्या ताब्यात एकूण ५० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तूल व चोरीची दुचाकी व मोबाईल असा आढळल्याने त्यास स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली.
याप्रकरणी आर्म ॲक्ट १६३/२०२४ ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. विलास पाटील हे करीत आहेत.