एरंडोल येथील मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव.

Images-2052513087.jpg


प्रतिनिधी – एरंडोल तहसील कार्यालयामध्ये कार्यरत मंडळ अधिकारी संजय लक्ष्मण साळुंखे यांचा स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. संजय लक्ष्मण साळुंखे यांची एकूण 33 वर्षे सेवा संपन्न झाली असून एरंडोल तहसील कार्यालयामध्ये मागील तीन वर्षापासून मंडळ अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. पाचोरा तालुक्यात तलाठी म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा दिलेली आहे.आपल्या कामाचे सातत्य व शासनाच्या विविध उपक्रमांचा सातत्याने पाठपुरावा इत्यादी बाबतीत त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यकुशलते बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत. जळगाव जिल्हा बौद्ध कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद  इत्यादी  सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!