भोई समाज मदत केंद्राच्या सहकार्याने एरंडोल येथील निराधार कुटुंबास आर्थिक मदत
प्रतिनिधी – एरंडोल येथील समाज बांधव रामदास उर्फ छोटू बुधा वाल्डे यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी दि. २५ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे मागे पत्नी व एक मुलगा होता.आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवारास भोई मदत केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत भ शिवदे व महारु शिवदे तसेच एरंडोल येथील राष्ट्रीय भोई एकता संघाचे अध्यक्ष व समन्वयक अशोक मोरे तसेच युवा मंचाचे अध्यक्ष नरेश भोई यांच्या प्रयत्नाने समाजाच्या व्यक्ती कडून मदत जमा करून आज रोजी त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता यांना रक्कम वीस हजार रुपयाचा चेक देण्यात आला. या वेळेस जिल्हा समन्वयक यशवंत शिवदे, महारू शिवदे,जळगाव व एरंडोल अशोक मोरे नरेश भोई,सोनू भोई,किशोर वाल्डे बंटी इ.उपस्थित होते.