न्यू इंग्लिश मीडियम स्कूल सह विविध ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात संपन्न
प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली .आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ,दहीहंडी व जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन सर व्हॉइस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या हस्ते श्रीकृष्ण भगवंताच्या प्रतिमा चे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी नववी वर्गाच्या विद्यार्थ्यांनीनी श्रीकृष्ण भगवंताच्या कारागृहातील जन्म प्रसंग सजीव आरास सादर केला. यात कंस मामाच्या भूमिकेत आकांक्षा इंगळे, उग्रसेन च्या भूमिकेत ख्याती तोतला, वासुदेव अनुश्री तर देवकी च्या भूमिकेत सलोनी कुमावत तर विष्णू भगवंताच्या भूमिकेत आशिता ठाकूर ,तसेच नंदबाबाच्या भूमिकेत खुशी जाट व पंडित कार्तिक भेलसेकर कुशल चौधरी समर्थ पाटील या या विद्यार्थ्यांनी सादर केले इयत्ता सातवी, आठवी, नववी, दहावी, या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गाण्यांवर वर आधारित सुंदर नृत्य केले. तर लहान बालकांनी राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषा मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले तसेच शेवटी दहीहंडी फोडण्याच्या ही कार्यक्रम शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मुलांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला त्यात दहावीच्या वर्गांचं योगदान अधिक होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री महाजन व तनिष्का मालपुरे यांनी केले तर आभार कविता पाटील यांनी केले या सर्व कार्यक्रमाची तयारी शाळेतील उपशिक्षक कविता पाटील मृणाल काबरा उज्वला धनगर आरती भेलसेकर व नाटिका सादर करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक पि.डी.बोरसे अनिता तिवारी तसेच त्या त्या वर्ग शिक्षकांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एरंडोल येथील ब्रह्मकुमारी सेंटर येथे सुद्धा जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. लहान बालके राधाकृष्णच्या वेशभूषेत सर्वांना आकर्षित करीत होते.
याप्रसंगी पुष्पा दीदी , सविता दीदी, छाया दीदी , यांच्यासह ब्रह्मकुमारी सदस्य उपस्थित होते.