एरंडोल शहर व तालुक्यातील सर्व शाळा परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्या बाबत दिले निवेदन.
प्रतिनिधी – एरंडोल शहर व तालुक्यातील सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाबत माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात एरंडोल शहर व तालुक्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित ( खाजगी विना खाजगी)
शाळांमध्ये सर्व कक्ष खोली मधे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व येणारे आणि जाणारे पालक व लोकांची आवक जावक रजिस्टर नोंद करणे सर्व जिल्हा परिषद व विनाअनुदानित शाळांमध्ये प्रत्येक खोली मधे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे व लेक लाडकी ची सुरक्षा अत्यंत गरजेची आहे तसेच विद्यार्थी सुरक्षा समिती’चे गठन एक आठवड्यात करण्यात यावे शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून हि समिती गठीत करण्यात यावी. ज्या प्रकारे कामांच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी देखील अशा उपाययोजना होणे गरजेचे आहे.शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात यावे. निवेदनाची दक्षता घेऊन उचित कारवाई करण्यात यावी व कारवाई केलेली एक प्रत अम्हाला पुरविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष सिताराम मराठे तालुका उपाध्यक्ष तुषार शिंपी विज्ञान पाटील नितीन ठक्कर राजधर महाजन अंकुश चव्हाण हितेश जोशी प्रभाकर महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.