एरंडोल येथे तीन दुकानावरती डल्ला पंचात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
प्रतिनिधी एरंडोल – येथील शांताराम दादा चौक परिसरातील तीन दुकानांचा छताचा पत्रा कट करून पन्नास हजार रु किमतीचा दुकानातील माल पसार केल्याची घटना २१ व २२ ऑगष्ट च्या मध्य रात्री घडली आहे. यात जे.एस. मोबाईल या मोबाईल रिपेरिंग च्या दुकानातून रिपेरिंगर साठी आलेल्या सात मोबाईल ३५००० हजार रु.,विक्रीचे पॉवरबँक ८ नाग ११००० हजार रु., हेडफोन १०००० हजार रु.व किरकोळ विक्रीचे साहित्य १०००० रु
तर संतोषी माता मल्टी सर्विसेस या ओन लाईन कामाच्या दुकानाच्या गल्यातील पाचशे रु. चिल्लर वर हात साफ केला व गणेश सलून दुकानाचे सध्या फर्निचरचे काम सुरु आहे तर त्या दुकानात चोरांना काहीच मिळाले नाही.
विशेष हे कि या दुकानांच्या समोरच न्यायालय व मा न्याधीशांचे निवास्थान आहे.व या रस्त्यावर रात्रभर रहदारी सुरु असते.याबाबत दुकानदारांनी एरंडोल पोलिसात लेखी अर्ज दिल्याचे सांगितले.सदर चोरी मुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.