शेतकऱ्याने बैल पोळ्यातून केली जनजागृती.
प्रतिनिधी – एरंडोल येथील प्रगतिशील शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद माळी यांनी बैल पोळ्याच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देत बैल पोळा सण साजरा केला.
प्रल्हाद माळी हे प्रगतिशील शेतकरी असुन त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून नेहमी सामाजिक जागृती करून समाजकार्य केले आहे.ते दरवर्षी बैल पोळ्याच्या दिवशी आपल्या बैलांना सजवून त्यांच्या अंगावर सामाजिक संदेश असणारे बॅनर परिधान करतात.यावर्षी देखील विविध सामाजिक संदेश देणारे बॅनर बनवले यात प्रामुख्याने विविध शैक्षणिक संदेश,राजकीय परिस्थितीवर कडवे संदेश,शेतकऱ्यांच्या समस्या असे विविध सामाजिक संदेश असणारे बॅनर त्यांनी बैलांच्या अंगावर परिधान करून त्यांना शहरात फिरवले.प्रल्हाद माळी यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.