श्री मंगळग्रह मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना

IMG-20240907-WA0244

विशेष प्रतिनिधी : भाद्रपद शुद्ध पक्षातील चतुर्थी अर्थात श्री गणेश चतुर्थीनिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था, संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, ७ सप्टेंबर रोजी मुख्य मानकरी अमळनेर महिला मंचाच्या सदस्या व टाकरखेडा (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे कार्यरत शिक्षिका रेखा वाल्मीक मराठे यांच्या शुभहस्ते सकाळी दहाच्या सुमारास अतिशय मंगलमय व चैतन्यमयी वातावरणात श्री गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शहरातील विविध महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते सकाळी व संध्याकाळी महाआरतीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. पुरोहित जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी मंत्रोच्चारात प्रधान संकल्प करून गणपती पूजन व वरुण पूजन केले. त्यानंतर श्री गणेशमूर्तीची महाआरती झाली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, तसेच मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!