कै. डॉ.जगदीशचंद्र जाजू व त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ. चित्राबाई जाजू यांच्या स्मरणार्थ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 9/9/ 2024 रोजी संस्थेचे सभासद चंद्रशेखर रामनाथ जाजू व त्यांच्या जाजू परिवारातर्फे त्यांचे दिवंगत मोठे बंधू कै.डॉ. जगदीशचंद्र रामनाथ जाजू व त्यांच्या धर्मपत्नी कै . चित्राबाई जगदीशचंद्र जाजू यांच्या स्मरणार्थ. इयत्ता पहिली ते दहावी मधील प्रत्येक वर्गातील मुलींमधून प्रथम व मुलांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस व भेटवस्तू समारोह संपन्न झाला. यावेळी शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात, कै. डॉ.जगदीशचंद् जाजू यांचा जीवनपट, व त्यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांना सांगितले . संस्थेचे सचिव श्रीकांत काबरा सर यांनीही आपल्या मनोगतातून जाजू परिवाराचे आभार मानले व गुणवंत विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विलास जी काबरा यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली ,त्यात गुणवंत विद्यार्थ्यां इयत्ता नववी वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला रणवीर बोरसे व मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली श्रुती वाणी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अभ्यासाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले की मोबाईल व मीडियापासून आपण लांब राहून आपल्या अभ्यासात आपण यश संपादन करू शकतो. तर रणवीर बोरसे ने सांगितले कीअभ्यासाची चिकाटी आपल्या अंगी असेल तर आपण आपलं ध्येय सहज गाठू शकतो. व पालक म्हणून पि डी बोरसे यांनी आपल्या मनोगतुन जाजू परिवाराचे मनःपूर्वक आभार मानून , असे प्रेरणादायी उपक्रम शाळेसाठी घेण्यात यावे ही आशा व्यक्त केली .तसेच या बक्षीस वितरण समारोह प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरा, उपाध्यक्ष श्रीकांत कांतीलाल काबरा ,सचिव श्रीकांत काबरा , न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन सिद्धेश जी महाजन, संस्थेचे सन्माननीय संचालक श्री अनुपम जाजू , संजय काबरा ,सागर मानुधने, विजय झवर, डॉ. नितीन राठी, जगदीश बिर्ला, राजू मणियार, बापू महाजन, विलास जी काबरा नरेंद्र मुंदडा व शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन ,सर वाईस प्रिन्सिपल सरिता पाटील व एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर ,कर्मचारी व एरंडोल शहरांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांचे संचालक व एरंडोल शहरातील प्रतिष्ठित नागरिक जाजू परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य विद्यार्थी उपस्थित होते. व कार्यक्रम संपन्न झाल्यावर स्नेहभोजनाची व्यवस्था त्यांनी केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता तिवारी व उज्ज्वला धनगर या उपशिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शनात प्रिन्सिपल सरांनी जाजू परिवाराचं आभार मानून विद्यार्थ्याप्रती प्रेरणादायी उपक्रम असेच आपण राबवावे ही अशा व्यक्त केली .