सर्व शासकीय कार्यालयात 28 सप्टेंबर 2024 हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा”…- माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघांची मागणी*

IMG-20240910-WA0053.jpg

विशेष प्रतिनिधी चाळीसगाव – येथील माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार
करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.
आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन
महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन
म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र. ३७८/०८/ सहा सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे
आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, व्याख्यानमाला इत्यादी विविध
उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. या शासन निर्णयाची या वर्षी आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी.
या वर्षी २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी चौथा शनिवारची सुट्टी व २९ सप्टेंबर ला रविवार असल्यामुळे शासकीय निर्णयाप्रमाणे सदर माहिती अधिकार दिन हा २७ सप्टेंबर २०२४ किंवा ३० सप्टेंबर २०२४ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात या आशयाचे निवेदन माहीती अधिकार कार्यकर्ता संघातर्फे  मा. तहसिलदार यांना देण्यात आले आहे.यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता संघाचे ता.कार्याध्यक्ष विजय गवळी, तालुका अध्यक्ष गफ्फार शेख,जेष्ठ पत्रकार शांताराम निकम, प्रचार संयोजक अशोकभाऊ छाबडीया,सदस्य महेंद्र सूर्यवंशी, रवींद्र कोष्टी, नितीन शेलार, गणेश अग्रवाल, राजा बापू चौधरी, किशोर जाधव, कैलास सूर्यवंशी, खुशाल मोरे, किरण चौधरी, विजुभाऊ देशमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!