राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एरंडोल शहराध्यक्षपदी ऍड ईश्वर भाऊ बिऱ्हाडे यांची निवड.
प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते ऍड.ईश्वर बिऱ्हाडे यांची एरंडोल शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पारोळा येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकीत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एरंडोल शहराध्यक्षपदी ऍड. ईश्वर युवराज बिऱ्हाडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक गजानन काळे ,माजी आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील , जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत सदर नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी एरंडोल तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष ऍड.अहमद सय्यद, राजेंद्र शिंदे, युवक तालुकाध्यक्ष कपिल पवार,संदीप वाघ, रवींद्र पाटील, विजय पाटील, भिकन खाटीक, यांच्यासह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.