एरंडोल तालुक्याचा राम पैलवान याचे जुदो स्पर्धेत घवघवीत यश
प्रतिनिधी – अमळनेर येथे प्रताप महाविद्यालय येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत राम राजेंद्र पाटील यांने 45 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.तो जिजामाता माध्यमिक विद्यामंदिर एरंडोल येथील विद्यार्थी आहे तो एरंडोल येथील प्रसिद्ध पैलवान नथू पैलवान यांचा नातू आहे. कुस्ती क्षेत्रात त्यांची चौथी पिढी मैदानात आहे.एरंडोल शहरातील प्रा. मनोज पाटील नगरसेवक यांचे ते पुतणे आहेत.राम पाटील याला कुस्ती व जुडोचे प्रशिक्षण गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था या ठिकाणी घेतो त्याचे प्रशिक्षक भानुदास आरखे, अनिल मराठे,योगेश्वरी मराठे दिलीप पहेलवान यांनी त्याला प्रशिक्षण दिले या विजयाबद्दल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील व युवा नेतृत्व अमोल पाटील, ऍड.किशोर काळकर,आनंद दाभाडे, नगरसेवक बबलू पैलवान, बाळा पैलवान यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.