विसरभोळेपणा आजार नसून एक समस्या आहे – ज्येष्ठांनो, नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करा
एरंडोलला ज्येष्ठ नागरीक संघात डॉ. फरहाज बोहरी यांचे ज्येष्ठांना मार्गदर्शन
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात नुकतेच जागतिक स्मृतीभ्रंश दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. फरहाज बोहरी होते. यावेळी ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी तसेच स्मृतीभ्रंश (विसरभोळेपणा) विषयावर आपल्या विनोदी शैलीत मार्गदर्शन करतांना सांगितले की, विसरभोळेपणा हा आजार नसून ती एक समस्या आहे. आपण आपल्या मेंदूला सदैव कामात ठेवा, नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच केअर टेकर वर अवलंबून राहू नका, जास्तीत जास्त लिखाण करा, नोंदीची आवश्यकता ज्येष्ठांना ज्याला नसते असे लक्षात ठेवू नका त्याची टिप्पणी करून ठेवा. वय हा एक आकडा आहे, जगात ज्येष्ठांची संख्या 2050 पर्यंत 25 टक्के होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या देखील वाढणार आहेत. स्वत:चे पैसे स्वत:वरच खर्च करा, मुलांची काळजी करू नका, वय व मेमरी स्ट्राँग ठेवा, मानसिकदृष्ट्या खचून जावू नका, शरिरास रक्तपुरवठा करणार्या नसा या मेंदूस देखील रक्त पुरवठा करतात त्यामुळे शरिर व मन प्रसन्न ठेवा. जर आपण वरील बाबींचा सकारात्मक विचार केला नाही तर प्रत्येकास हायवेवर जातांना जसा टोलटॅक्स भरावा लागतो तसा आपणास देखील डॉक्टररूपी टोलटॅक्स भरण्याची वेळ येवू देवू नका असा सल्ला त्यांनी उदाहरणासह ज्येष्ठांना मार्गदर्शन करतांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निंबा बडगुजर तर सूत्रसंचलन सचिव विनायक कुळकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष जाधवराव जगताप, पी. जी. चौधरी सर, प्रा. शिवाजीराव अहिरराव, गणेश पाटील, नामदेवराव पाटील, भगवान महाजन, सुपडू शिंपी, जगन महाजन, वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, सुरेश देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्रा. शिवाजीराव अहिरराव, अरूण माळी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. आभार पी. जी. चौधरी सर यांनी मानले. कार्यक्रमास भागवत पाटील, जगन्नाथ चौधरी सर, भिकन पाटील, सुभाष दर्शे, रूपसिंग सुर्यवंशी, विश्वनाथ ब्रम्हे, रघुनाथ गोटू पाटील, शांताराम देशमुख, दगडू सोनार, घन:श्याम महाजन, डॉ. मयुर चव्हाण, प्रा. वामनराव माळी, निंबा कुंभार, सदाशिव सोनवणे, सुरेश ठाकूर, सुरेश बडगुजर, मधुकर निळे, सुरेश पाटील, रविंद्र वाघ, बुधा पाटील यांचेसह ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.