एरंडोल तहसील कार्यालयाच्या लाकडांचीगुजरातकडे परस्पर विल्हेवाट.
सामाजिक कार्यकर्ते आंनदा चौधरी यांची माजी मंत्री डॉ.सतिश पाटील यांच्या कडे तक्रार.
प्रतिनिधी – एरंडोल येथील तहसील कार्यालयाच्या नूतन कार्यालय बांधकाम करण्यात येणार असल्याने पुरातन काळात १८९२ साली बांधल्या गेलेल्या तहसील कार्यालय पाडण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे त्यातील निघालेल्या सागवानी लाकडांची गुजरात कडे परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी यांनी माजी मंत्री डॉ.सतिश पाटील यांच्या कडे तक्रार केली.त्यानुसार माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर लाकडांची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सामाजिक कार्यकर्ते आंनदा चौधरी यांनी दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी पाऊस सुरू असताना तहसील कार्यालयाच्या आवारातून लाकडांनी भरलेले ३ ते ४ ट्रक निघालेले पाहिले. या बाबतीत माजी मंत्री डॉ.सतिश पाटील यांना त्यांनी याबाबत माहिती दिली.तर डॉ.सतीश पाटील यांनी प्रांताधिकारी यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या बाबतीत बांधकाम विभाग आपल्याला माहिती देऊ शकेल नंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे डॉ. सतीश पाटील यांना समाधान न झाल्याने दि.२६ रोजी स्वतः तहसील कार्यालयांचे निरीक्षण केले व पत्रकार परिषद घेतली व याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण न करता आपल्या पदाचा वापर करून मर्जीतील लोकांकडे काम देण्यात आले असल्याचा आरोप केला. किती घनफूट लाकुड निघाले यांची शहानिशा न करता व त्या लाकडांची व्हॅल्यूएशन न करता संबंधित व्यक्तीने शासना कडे फक्त १, लाख ९१ हजार रुपये भरल्याचे सांगितले. यामुळे शासनाचे नुकसान झाले असून या बाबतीत चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. शासनाकडे पैसे उपलब्ध नसल्याने श्रावण बाळ , संजय गांधी निराधार योजनाचे पैसे थांबले असल्याने अनेक वयस्कर व्यक्तींना त्रास होत आहे. नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध नसून फक्त नारळ फोडण्यासाठी घाई करत असल्याचे देखील सांगितले.
या प्रसंगी उपस्थित वेंडर लोकांनी आपल्या समस्या निवेदनाद्वारे मांडल्या व त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन डॉ.पाटील यांनी दिले.
पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी , डॉ. राजेंद्र देसले तालुका प्रमुख , ईश्वर बिर्हाडे शहर प्रमुख , संदीप वाघ व्यापार आघाडी प्रमुख , उमेश पाटील जिल्हा सरचिटणीस , विजय पाटील जिल्हा युवक सर चिटणीस , जगदीश पवार , दीपक अहिरे आदिवासी सेल प्रमुख , दत्तू पाटील आधी कार्यकर्ते उपस्थित होते.