क्रिडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलते – अरुण पवार,आदिवासी प्रकल्प अधिकारी.
प्रतिनिधी – एरंडोल – क्रिडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलते असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी एरंडोल तालुक्यातील पातर खेडा येथील आश्रमशाळेत आयोजीत बीट स्तरीय क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील,पालकत्व अधिकारी विश्वास गायकवाड,सचिव विजय पाटील,संस्थापक अध्यक्ष शिवाजी पाटील,संचालक अजय पाटील, बीट मधील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक व इतर मान्यवर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेऊन आपली चुणूक दाखवली.आश्रम शाळेतर्फे सर्व खेळाडूंना टी शर्ट वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरेंद्र तिरभाने यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले.