राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक सरचिटणीस , सामाजिक कार्यकर्ते ईश्वर सोनार यांना विविध दुर्गा देवी मंडळात मिळाला आरतीचा मान.
प्रतिनिधी – एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक सरचिटणीस ( अजित पवार गट ) ईश्वर सोनार यांच्या हस्ते जय अंबे मित्र मंडळ पिंपळकोठा खु. , नवदुर्गा मित्र मंडळ पिंपळकोठा खु. , नवयुवक मित्र मंडळ पिंपळकोठा खु. , मरी माता मित्र मंडळ पिंपळकोठा खु., जय बजरंग मित्र मंडळ पिंपळकोठा खु., जय भवानी मित्र मंडळ पिंपळकोठा खु., चामुंडा मित्र मंडळ, व रवंजे येथील पंचवटी मित्र मंडळ अशा अनेक मंडळात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
तसेच प्रत्येक मंडळात जनसंपर्क साधत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच महिलांशी संवाद साधत लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या मानधन बद्दल जाणून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. व ज्या बहिणीच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांच्या समस्या समजून लवकरात लवकर त्यांना पैसे खात्यात येतील असे आश्वासन दिले . नंतर लाडक्या बहिणी व लाडक्या भाऊ सोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी गोपाल पाटील , संदीप भुरे , पवन देशमुख , भगवान हटकर , दिनेश हटकर , अविनाश पाटील , समाधान माने , सोपान मराठी , मधुकर पाटील , सागर मराठे , अमोल शिंदे , राहुल मराठे , धर्मा मराठे , नाना मराठे , राहुल पाटील , अतुल वाघ , सागर हटकर , अजय गर्डे , लोटन नाईक , आकाश हटकर , मुकेश सुतार , मुकेश गोसावी , पवन वडर , सागर वडर , पवन सुतार , राहुल मोरे , तौसीफ मन्यार , विशाल सोनवणे , आकाश मोरे सागर भील , समाधान मोरे , व मित्रमंडळी उपस्थित होते.