एरंडोल येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी एरंडोल- येथे ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील विविध ठिकाणी गुर्जर समाजाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने सकाळी ८ वाजता राष्ट्रीय एकता दिन साजरा करीत संपूर्ण शहरातून वाजत गाजत मोटार रॅली काढण्यात आली.२०० ते २५० समाज बांधवांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.एरंडोल येथील नवीन वसाहतीतील ओंकारेश्वर मंदिराजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गुर्जर समाज मंडळ अध्यक्ष गोपाल पाटील, प्रा.गणेश महाजन, रामभाऊ पाटील, दिनेश महाजन,प्रा .मनोज पाटील,गजानन पाटील, प्रेमचंद पाटील,लक्ष्मण पाटील,माधव पाटील, मयुर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी एरंडोल शहरातील व नवीन वसाहतीतील बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर जहांगीर पुरा येथे अमोल पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील,प्रा.गणेश महाजन, नितीन महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मेनरोडवरील कुंभारटेक येथे सुनील भैय्या पाटील, भुषण पाटील, दिपक पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, सदाशिव पाटील, गोरख महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
सकाळी १० वाजता समस्त गुर्जर समाज मंडळातर्फे एरंडोल येथील मारोती मढीच्या सभागृहातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
इ.१० वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी कु.अनुष्का हरीश महाजन ( ९५%)तनुश्री राजेश पाटील(९०.४%), तनिष्का बाळासाहेब पाटील(८४.६%),जयेश नितीन पाटील (८३.६%), भुमिका प्रमोद पाटील (८२.४%),वैष्णवी गजानन पाटील (८१.४%),सुजल राजेंद्र पाटील (७९.६%),सर्वेश सुनील पाटील (७२.५%),उमेश सुनील पाटील (६९.५%),इ.१२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी कुमार जयेश सुनील पाटील (६१.५%),एम एस सी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी कु.प्रचिता सदानंद पाटील ( ८३.५%). सर्व समाज बांधवांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.याप्रसंगी गुर्जर समाज मंडळ अध्यक्ष गोपाल पाटील,उपाध्यक्ष नितीन महाजन, सेक्रेटरी प्रा.गणेश महाजन, खजिनदार सदाशिव पाटील, रामदास पाटील, गोरख महाजन,माधव पाटील, दिनेश महाजन,नरेंद्र पाटील, प्रा.शरद महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिनेश महाजन यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तसेच आभार प्रा.गणेश महाजन यांनी केले.
सायंकाळी ५ वाजता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेची सवाद्य वाजत गाजत सर्व समाज बांधव एकत्र येऊन मिरवणूक काढण्यात आली.ठिकठिकाणी महिलांनी प्रतिमेचे पूजन व आरती केली.