राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल भाऊ महाजन यांची नियुक्ती.
विशेष प्रतिनिधी – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार गुलाबराव अप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक – सचिव अनिलभाऊ महाजन यांची निवड करण्यात आली आहे. उमेदवार गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ
दैनंदिन सर्व कामकाजामध्ये लक्ष घालणे व त्याचप्रमाणे प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून दैनंदिन घडामोडीचा अहवाल द्यावा. असे आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहेत. तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी सहीनशी नियुक्तीपत्र दिले.