कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथील इसमास सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची कारवाई….
प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथील भुषण रविंद्र पवार (३१) यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१) अ/ब नुसार हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी भाग चाळिसगाव , व स.पोलीस निरिक्षक , कासोदा पोलिस स्टेशन कासोदा , ता. एरंडोल यांनी उपविभागीय दंडधिकारी (प्रांताधिकारी) एरंडोल यांच्या कडे प्रस्ताव सादर केला होता. सदर इसमावर फौजदारी कायद्याचे विविध कलमांतर्गत चार गुन्ह्यांची नोंद असून त्यांचा सतत गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांच्याकडून आगामी साजरे होणारे सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या काळात अनुसूचित प्रकार घडण्याची संभावना असल्याने व कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याचा संभव असल्याचे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये , तसेच शांतता भंग होऊ नये याकरिता भुषण रविंद्र पवार राहणार आडगाव ता. एरंडोल जि. जळगाव यास मनिषकुमार गायकवाड उपविभागीय दंडाधिकारी एरंडोल भाग यांनी दिनांक ०६/११/२०२४च्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ)(ब)अन्वये, आदेशाच्या दिनांकापासून जळगाव जिल्ह्यातून सहा महिने करिता हद्दपार करण्यात आलेले आहे. परंतु सदर इसम हा आडगाव येथील मतदार असल्यामुळे त्यास दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी दोन तासांसाठी मतदान करण्याची अनुमती देण्यात आली आहे.