अमोल पाटील यांचा प्रचारार्थ अभिनेता गोविंदाची एरंडोल येथे एन्ट्री .
प्रतिनिधी -एरंडोल पारोळा भडगांव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचारासाठी प्रख्यात सिने अभिनेते गोविंदा आहुजा यांच्या रॅलीचे भव्य रोड शोचे आयोजन आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पांच वाजता करण्यात आले आहे.
एरंडोल पारोळा भडगांव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते अमोल पाटील यांचा प्रचार करत आहे. तसेच अमोल पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. अमोल पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते गोविंदा हे एरंडोल शहरात आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पांच वाजता येत आहे.
सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे हा रोड शो महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, अमळनेर दरवाजा, श्री विठ्ठल मंदिर पांडव वाडा, श्रीराम मंदिर,भोई गल्ली, जे डी सी सी बँक, राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बुधवार दरवाजा, चुनाभट्टी, रंगारी खिडकी पूल, श्री दत्त मंदिर, जय हिंद चौक, मेन रोड, व जोहरी गल्लीतील गुरुद्वारा जवळ या रोड शोच्या समारोप करण्यात येणार आहे.