मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी सज्ज …नियोजित स्थळी निवडणूक साहित्य रवाना
प्रतिनिधी – एरंडोल – पारोळा भडगांव विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज एरंडोल येथे शासकीय एरंडोल पारोळा भडगांव मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (दि. २० नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज एरंडोल पारोळा भडगांव मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी मतदान नियोजित मतदान केंद्राकडे मतदानाधिकारी व कर्मचारी यांना पोहोचवण्यासाठी सुसज्ज अशा शासकीय व खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली . या सर्व वाहनांमध्ये पोलीस बंदोबस्तसह मतदानासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व अधिकारी वाहनाने रवाना करण्यात आले. एरंडोल पारोळा भडगाव १६ विधानसभा मतदारसंघात २९८ मतदान केंद्र असून आज दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वाटप करण्यात आले .
प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी , कर्मचारी व एका पोलीसाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस बांधव यामध्ये राखीव पोलीस दल केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स होमगार्ड पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी इत्यादी ७०० जवानांचा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे.