एरंडोल:- महिलांसाठी स्तन कॅन्सर चेकअप गुणगौरव हळदी कुंकू जय श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम….
एरंडोल:-येथे श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसरात सालाबादप्रमाणे जय श्रीराम प्रतिष्ठाने महिलांसाठी मोफत स्तन कॅन्सर चेकअप शिबिरात नचिकेत सोनोग्राफी सेंटर च्या डॉक्टर गीतांजली ठाकूर यांनी पोस्टर्स द्वारे स्तन कॅन्सरची सविस्तर माहिती देऊन स्व तपासणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात ५५ महिलांनी तपासणी करून घेतली.माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी हळदी कुंकू भारतीय संस्कृतीचे महत्व याबाबत हितगुज केले. माजी उपनगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी महिलांना आरोग्य जनजागृती , माऊली हॉस्पिटलच्या बालरोग तज्ञ डॉक्टर प्रीती चौधरी लहान मोबाईल पासून कसे दूर ठेवावे. याबाबत सांगितले.
कार्यक्रमात स्वागत गीत प्रस्तावना ज्योत्स्ना जाधव. सूत्रसंचालन प्राची सदानंद पाटील , मेघा जितेंद्र पाटील , आभार जयश्री महाजन, यावेळी माजी नगरसेविका सरला पाटील, कल्पना महाजन, आरती महाजन, हर्षाली महाजन शोभा पाटील, नीता महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात शोभा पाटील परिचारिका ग्रामीण रुग्णालय कासोदा यांचा शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल व कुस्ती या खेळत राज्यस्तरीय कांस्यपदक मिळवलेल्या योगेश्वरी मराठे, प्रेरणा मराठे, यामिनी आरखे, भूमिका पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला ,
समाजकार्यात महिलांच्या आरोग्यासाठी यापुढे स्तन कॅन्सर मेमोग्राफी शिबिर, डोळ्यांचे मोफत ऑपरेशन शिबिर राबवण्याचे मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे यांनी यावेळी केला.
सदानंद पाटील, ऋषिकेश महाजन, अनंत महाजन ,कृष्णा पाटील , ओम पाटील, धीरज पाटील, व जय श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली