मुंबईतील तरुणीने दारुच्या नशेत फोन उचलला आणि थेट बंगळुरुहून बिर्याणी मागवली..
मुंबई) बिर्याणी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच. आपल्या अवतीभोवतीचे अनेकजण दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या वेळी बिर्याणी ऑर्डर देण्यास प्राधान्य देतात. पण मग कधी-कधी ऑनलाईन ऑर्डर देताना चूक होते आणि त्यानंतर गोंधळ निर्माण होतो. असाच काहीसा गोंधळ मुंबईतील एका मुलीसोबत झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील एका मुलीने जेवणाची ऑर्डर देण्यासाठी तिचा फोन उचलला तेव्हा तिने लगेच बिर्याणीची निवड केली. पण मद्यधुंद अवस्थेत तिने चुकून दुसऱ्या राज्यातून ऑर्डर दिली. त्यानंतर जे घडले ते खूपच मनोरंजक आहे.
मुंबईतील एका मद्यधुंद मुलीने चुकून बंगळुरुमधील रेस्टॉरंटमधून 2500 रुपये किंमतीची बिर्याणी ऑर्डर केली. ही ऑर्डर फूड डिलिव्हरी कंपनीच्या अॅपवरुन देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुंबईतून दिलेली बंगळुरुतील बिर्याणीची ऑर्डर डिलिव्हर केली. ऑर्डर मिळाल्यानंतर मात्र हा सगळा प्रकार त्या मुलीच्या लक्षात आला.