कैं.दिलीप तात्या जगताप यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
एरंडोल/प्रतिनिधी : धुळे शहरातील माजी नगराध्यक्ष कै. दिलीपतात्या उमराव जगताप यांच्या ७३ व्या जयंती निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी विदायक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या विदायक विकास कामांना उपस्थितीचे आवाहन राहुल जगताप, केतन जगताप, दिनेश जगताप, डॉ. राकेश जगताप यांनी केले आहे.
यात दि. २५ जानेवारी रोजी सुरुवातीला सकाळी अकरा वाजता हॉटेल चंद्रदिप रिजेंसी येथे दिलीपतात्या जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी धुळे शहराच्या विकासासाठी नेहमीच झटणारे कै. दिलीपतात्या जगताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून गाईंना चारा खाऊ घालणे, गल्ली नं. ७ पारोळा रोड खुंट येथे चर्मकार समाज मंदीराचा वचनपुर्ती व कामाचा शुभारंभ सोहळा होणार आहे. तसेच मंदिरात मोफत खुर्च्या वाटप करण्यात येणार आहेत.
यावेळी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेदरम्यान चर्मकार समाज मंदिरात अभिवादनाचा व मंदिराच्या कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक कै. दिलीपतात्या उमराव जगताप प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे