एरंडोल येथे मनसेची आढावा बैठक…..
एरंडोल प्रतिनिधी –
दि. २२/०१/२०२३ रोजी एरंडोल येथे मनसे ची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष मा.अनिलभाऊ वाघ यांचे नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आजपर्यंत पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्यास सांगितले तसेच प्रत्येक तालुक्यातील गावागावात शाखा सुरू करण्याच्या सूचना दिल्या . या वेळी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून पारोळा येथील शरद जोशी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नीलेश चौधरी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला तसेच एरंडोल शहर व तालुक्यातील तरुणांनी आज पक्षप्रवेश केला. यात एरंडोल येथील उमेश सुतार , नामदेव महाजन , कासोदा येथील अक्षय शिंपी , किशोर शिंपी , प्रतीक चिंचोले , सर्वेश वाणी , विखरण चे मा. सरपंच लहू महाजन , नंदगाव येथील हिम्मत पाटील , योगेश पाटील , बाळासाहेब पाटील उत्राण तळई गटातुन वासुदेव कोळी यांनी प्रवेश घेतला. ह्यावेळी संपर्क प्रमुख मा. विनयजी भोईटे , जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ बागुल यांनी यावेळी मनसे चे रवंजे येथील राधेश्याम कोळी यांची तालुका उपाध्यक्षपदी , उमेशभाऊ सुतार यांची एरंडोल शहर सचिव अक्षय शिंपी, कासोदा शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. सदर आढावा बैठकीला एरंडोल तालुकाध्यक्ष विशालभाऊ सोनार , चाळीसगाव तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील , भडगाव तालुकाध्यक्ष सागर पाटील , पारोळा तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील .एरंडोल शहराध्यक्ष अनिलभाऊ महाजन , एरंडोल ता. सचिव अनिल पाथरवट पारोळा शहराध्यक्ष छोटुभाऊ लोहार , रावसाहेब महाजन,, ता.उपाध्यक्ष राधेश्याम कोळी , शाम पाटील परवेझ पठाण, हर्षल वाघ यांच्या तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.