निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय…

IMG-20230124-WA0018.jpg

एरंडोल — निपाणे येथील सुभाष को ऑफ दुध डेअरीची पंचवार्षिक निवडणूक दिनांक २२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात शांतेतेत पार पडली.
दुध डेअरीचे एकुण सभासद १७ आहेत यात चार जागा बिनविरोध झाल्या होत्या व १३ जागांसाठी निवडणूक लागली होती, जनरल जागांसाठी १२ तर ओ बी सी जागासाठी एक असे आमनेसामने सरळ लढत होती यात शेतकरी विकास पॅनलला १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय झाला तर श्री संत हरिहर महाराज विकास पॅनलला १३ पैकी २ जागांवर समाधान मानावे लागले या पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे .
शेतकरी विकास पॅनलचे विजय उमेदवार — मच्छिंद्र दामु महाजन , तुकाराम नागो महाजन , ईश्वर नाना पाटील , कौतिक पितांबर पाटील , प्रमोद नारायण पाटील , प्रमोद विश्वनाथ पाटील , संतोष चिंतामण पाटील , संजय जालम पाटील , संजय श्रावण पाटील , विनोद सुरेश पाटील , व ओ बी सी जागासाठी हर्षल चंद्रभान पाटील , श्री संत हरिहर महाराज विकास पॅनलचे विजय उमेदवार अरुण कुमार शेनपडू पाटील व दिलीप तोताराम पाटील , बिनविरोध पांडुरंग प्रल्हाद ठाकूर ( एस टी) , विजय धनराज राठोड ( अनुसूचित जाती जमाती ) , संगीताबाई सुकलाल पाटील व सुनंदाबाई सुरेश पाटील ( स्रि राखीव ) हे उमेदवार निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंत गंगाधर नेखे ( लेखी परीक्षेक) यांनी काम पाहिले तर सचिव किरण शिवाजी पाटील यांनी सहकार्य केले.
या निवडणुकीत गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले व विजयी उमेदवारांचे स्वागत व कौतुक केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!