राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एरंडोल महाविद्यालयात रागोळी स्पर्धेचे आयोजन

IMG-20230125-WA0119.jpg

एरंडोल:- येथे तहसील कार्यालय दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय युवती सभा मंच यांचा संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील १४ विद्यार्थिनी आपला सहभाग नोंदवला  याप्रसंगी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो माझे मतं माझे भविष्य, मतदानाचे महत्व, महिला सबलीकरण इत्यादि विषय रांगोळी स्पर्धेसाठी देण्यात आले होते. याप्रसंगी संस्था अध्यक्ष अमित पाटिल, एरंडोल नगरीच्या तहसीलदार  सुचिता चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एन्.ए. पाटिल, उप प्राचार्य डॉ. ए. ए  बडगुजर यांनी स्पर्धेला भेट दिली व सहभागी विद्यार्थीनींचे कौतुक केले. रांगोळी स्पर्धेत विजेते प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रम राजेश्वरी भगवान सोनार, श्वेता गोपाल शिंपी, निकिता गजानन पाटिल, अश्विनी अनिल चौधरी यांना युवती सभा मंचाच्या वतीने बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.परीक्षणाचे काम के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या आर्ट टीचर शीतल पाटील यानी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. के जे वाघ, डॉ स्वाती शेलार, डॉ. मीना काळे, डॉ रेखा साळुंखे, डॉ. शर्मिला गाडगे डॉ. सविता पाटिल यांनी सहकार्य केले

About Author

You may have missed

error: Content is protected !!