प्रा.रणजित मोरे यांना पी.एच. डी.पदवी प्रदान.
प्रतिनिधी – एरंडोल येथील व आदिवासी विकास विभाग नाशिक संचलित एकलव्य मॉडेल रेसि.स्कुल चिखलदरा ता. चिखलदरा जि. अमरावती येथील अधीक्षक येथील प्रा.रणजित मोरे यांना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे सामाजिक शास्त्रे मानव्य शास्त्र विद्याशाखे अंतर्गत समाजकार्य विषयातील “आरक्षण धोरणाबाबत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सक्रिय पदाधिकाऱ्यांच्या मतांचे विश्लेषणात्मक अध्ययन” विषयात संशोधन केल्याबद्दल पी.एच. डी.पदवी प्रदान करण्यात आली.सदर पदवी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.विजय माहेश्र्वरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
सदर प्रबंध सादर करण्यासाठी मोरे यांना चोपडा येथील प्रा. डॉ.विष्णू गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.प्रा.डॉ.रणजित मोरे यांनी याअगोदर नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.सदर यशाबद्दल मोरे यांचे संदिप पाटील,अविनाश सोनवणे,आकाश अहिरे,राहुल पवार,ad.समीर वाल्हे, संदिप मोरे व समस्त सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.