शेतकऱ्याने चक्क शेतात अनोख्या फवारणीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे..
भंडारा : भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याने शेतात चक्क शेतात देशी दारुची फवारणी केली आहे
YouTube वर व्हिडिओ पाहून या शेतकऱ्याने डोकं लावलं आहे. शेतकऱ्याने केलेल्या अनोख्या फवारणीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. शराब हर मर्ज की दवा है… हे वाक्य आपन तळीरामांकडून नेहमीच ऐकत असतो. मात्र, देशी दारू धान पिकाला पोषक ठरत आहे. हे ऐकुन धक्का बसला न पण हे खरे आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आपल्या धान पऱ्याची उत्तम वाढ होण्यासाठी तसेच रोग आणि कीडी पासून बचाव करण्यासाठी धान पऱ्याला टॉनिक म्हणून देशी दारूची पाण्यासह फवारणी करत आहे. याउलट दारू ने धान पिक उत्तम येत असल्याचा विश्वास या शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.
वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पऱ्हे हे पिवळे पडून कीडग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे. रामदास गोंदोळे या युवा शेतकऱ्याने YouTube वरुन जालीम उपाय शोधला आहे. शेतात देशी दारूची फवारणी करत धान परे रोग मुक्त केले आहे. यासाठी एका फवारणी पंपात पाण्यासह 90 एम एल दारूचे मिश्रण करून ते फवारणी करीत आहे. YouTube वरुन व्हिडिओ पाहून रामदास याने हा उपाय शोधला आहे.
देशी दारूचा उतारा ही माहिती परिसरात पसरताच इतर शेतकरी ही गोंदोळे यांच्या शेतात भेट देत आहेत. हे तंत्र समजून आपल्यां शेतात ही धान पिकावर फवारणी करणार असल्याचे सांगत आहे. एकीकडे खत-बियाने- फवारणी रोग औषधी महाग झाले असतांना केवळ 45 रूपयाच्या दारू ने पिक वाचवण्यास मदत होत आहे.