Viral Video: पापा की परीचं करायचं काय! रस्त्यावर करत होती स्टंट; पाठीमागून गाडी आली अन्…. थरारक

n46914754016757464643087a81be1de33722707a6d70204b1dd764f563edeb1c6e8457f9474c9f0650adf5.jpg

सोशल मीडियावर बेदरकारपणे गाडी चालवत अपघात झाल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. चालकाच्या निष्काळजीपणाचा नाहक त्रास दुसऱ्यांना सहन करावा लागतो.

अशा निष्काळजी चालकांमुळे अनेकदा चुक नसतानाही एखाद्याला जिव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सध्या अशाच एका निष्काळजी तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही तरुणी बेदरकारपणे गाडी चालवताना दुसऱ्या गाडीला धडक देते, आणि तशीच सुसाट निघून जाते. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणी गाडी चालवताना दिसतात. अनेकदा मुली गाडीवर धोकादायक स्टंट करताना, स्टाईलमध्ये गाडी चालवताना दिसतात, ज्यामुळे अपघातही घडतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे.

ज्यामध्ये एक तरुणी बाईक चालवताना जीवघेणा स्टंट करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये या मुलीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालतांना अपघाताला सामोरं जावं लागलं आहे.

व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध तिची बाईक वेडीवाकडी आणि अतिशय वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे गाडी कलवत ती तिच्याच नादात ड्रायव्हिंग करताना दिसत आहे.

मात्र तिच्या या अशाच निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे मोठा अपघात होताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी तरुणीच्या या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!