अनोळखी तरुण-तरुणी विमानात भेटले, नेहमीसाठी एकदुसऱ्याचे झाले, अशी आहे कहाणी
नवी दिल्ली : दोन अनोळखी व्यक्ती विमानात भेटले. एक तरुण-एक तरुणी विमान प्रवासात पहिल्यांदाचं भेटले. पण, दोघेही नेहमीसाठी एकत्र आले. या दोघांच्या नात्याला आता ४० वर्षे झालीत. त्यांचं नात जोडण्यासाठी एका महिलेनं महत्त्वाची भूमिका निभावली. विकी मोरत्ज आणि ग्राहम किडनरच्या लग्नाला चार दशकं पूर्ण झालीत. फेब्रुवारी १९८२ ची गोष्ट. तेव्हा विकी ४० वर्षांची होती. पहिल्यांदा अभ्यासासाठी अमेरिकेहून लंडनला जात होती. तिच्यासोबत तिची मैत्रीण सँड्रा होती. दोन्ही मैत्रिणी कधीही विमानात बसल्या नव्हत्या. घाईघाईत त्यांनी स्वस्त तिकीट खरेदी केली. विमानात जागा मिळण्याची शक्यता नव्हती.
विमानात बसायला जागा मिळणार नाही, या भीतीने दोघीही घाबरल्या होत्या. पण, त्यांनी शेवटच्या रांगेत बसण्यासाठी जागा मिळाली. तिथं तीन सिट्स होत्या. तिसऱ्या सीटवर इंग्लंडमधील ग्राहम बसला होता. तेव्हा तो २२ वर्षांचा होता. ग्राहमनं एका वर्षापूर्वी पदवी घेतली होती. ग्राहम लंडनला फिरण्यासाठी जात होता.
कसे बनले जीवनसाथी
आठवड्याच्या शेवटी ग्राहम परत आला. मित्र जीमसोबत सर्व जण लंडनमधील प्रसिद्ध ठिकाणी फिरायला गेले. लंडनमधील गर्दीच्या स्टेशनवर गेले. जीम आणि सँड्रा एकिकडं उभे झाले. विकी आणि ग्राहम दुसरीकडं गेले. एक महिला त्यांच्याकडं आली. तीनं विचारलं की, दोघांचीही राशी वृषक आहे का. त्यांनी हो म्हंटलं. त्या महिलेनं म्हंटलं तुमच्यामध्ये प्रेम झालंय. आता तुम्ही दोघेही एकमेकांची जीवनसाथी होणार.
अनोळखी महिलेला दोघांच्याही जन्मदिवसाची तारीख माहीत नव्हती. तसेच त्यांच्या जीवनाशी संबंधित कोणतीही माहिती नव्हती. सुरुवातीला दोघांनीही हा विषय गमतीवर नेला. नंतर ६ मार्चला एकदुसऱ्याचा हात पकडला. दोघांनीही ४ जुलैला साक्षगंध केला. २८ डिसेंबरला लग्न केलं. दोघेही आम्ही भेटल्याचं कारण ती अनोळखी महिला असल्याचं सांगतात. व्हॅलेंटाई डेच्या निमित्ताने ही लव्ह स्टोरी समोर आली.